बिग बी अमिताभ बच्चन म्हणाले, कोरोना योद्ध्यांसाठी काय केले?

 


कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोरोना योद्ध्यांसाठी सरकार काय उपाययोजना करतंय? असा प्रश्न जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विचारला. त्यांच्या या प्रश्नाला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्रत्युत्तर दिले.

     अमिताभ बच्चन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. हर्षवर्धन यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांना कोरोना योद्ध्यांसाठी केलेल्या उपाययोजना सांगितल्या. ते म्हणाले," कोरोना योद्ध्यांना आम्ही दिवसरात्र मदत करतोय. त्यांच्या येण्याजाण्यासठी खास गाड्यांची सोय केली आहे. शिवाय ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं आहे. जी मंडळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या सुरक्षतितेसाठ दिवसरात्र काम करतायेत त्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे आहे. त्यांनी काळजी करू नये. असे आश्वासन त्यांनी या मुलाखतीमध्ये दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या