धोनीच्या संघाला मोठा धक्का !

 IPL २०२० :धोनीच्या संघाला मोठा धक्का बसला, स्टार खेळाडू सुरुवातीच्या सामन्यातून बाद झाला.


IPL २०२० : रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितीत आयपीएलचा १३ वा सिझन खेळणाऱ्या धोनीच्या संघाला अजून एक मोठा धक्का बसला.




        इंडियन प्रीमियर लीगच्या १३व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज ने मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव करत आपला प्रवास सुरु केला. चेन्नई सुपर किंग्ज ला मात्र पहिल्या सामन्यात आपला स्टार खेळाडू 'ड्वेन ब्राव्हो' विना मैदानात उतरावे लागले. सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी याची पुष्टी केली की टीमचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो आयपीएल १३चे आणखी काही सामने खेळू शकणार नाही.

     वेस्ट इंडिजचा दिगग्ज खेळाडू नसतानाही तीन वेळा चॅम्पियन सीएसकेने पहिला सामना सहज जिंकला. फ्लेमिंगने सामन्यानंतर सांगितले की,"ड्वेन आणखी काही सामन्यांसाठी बाहेर असेल. नुकत्याच पार पडलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगदरम्यान ब्राव्हो ला दुखापत झाली होती. आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे अंतिम सामना गमावला होता. ब्राव्होची जागा घेणाऱ्या इंग्लंड चा अष्टपैलू 'सॅम कुरेन' याने सीएसकेला सहा चेंडूत १८ धावा देऊन लक्ष्य गाठण्यास मदत केली. तर अंबाती रायडू आणि फाफ डुप्लेसिसने अर्धशतक ठोकले.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या